पोलीस वारंट न्यूज नेटवर्क : १ सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे मागील काही दिवसात चोरीचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच चोरांनी गोलेकर लवण येथे मोठी चोरी करून एका ५७ वर्षीय व्यक्तीस जखमी गेले होते.
चोर्यांचे प्रमाण वाढलेले असताना आता गेले काही दिवसांपासून खर्डा भागात लाईटच्या लोडशेडिंगचाही प्रश्न निर्माण झाला आहे. लोड शेडिंगमुळे लाईट दररोज संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत जाते. किंवा ती मध्यरात्री ही जाऊ शकते त्यामुळे आपल्या घरातील मुद्देमालालाची चोरी होऊ नये किंवा चोरांपासून आपल्या जीवीतास काही धोका होऊ नये यासाठी खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी केले आहे.
चोरी होण्याची मोठी दाट शक्यता आहे
याच पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा यंत्रणेचाही वापर करण्याचे प्रात्याक्षिक यावेळी दाखवण्यात आले. त्यानुसार
खर्डा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल शेषराव मस्के यांनी काल रात्री ८.४६ वाजता ग्रामसुरक्षा यंत्रणा वरून नागरिकांशी संवाद साधला. एक सावधान राहण्याचा संदेश त्यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणाद्वारे दिला , काही अडचण आल्यास किंवा कोणी संशयित व्यक्ती आढळल्या तात्काळ खर्डा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा अश्या प्रकारचा तो संदेश होता. हा संदेश मिळताच अनेक नागरिक सतर्क झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात ग्रामसुरक्षा यंत्रणेत सामील व्हावे असही आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट
अलिकडील काही दिवसांमध्ये खर्डा शहरात जास्त चोऱ्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळेस जास्तीत जास्त पेट्रोलिंग करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
No comments:
Post a Comment