जामखेड प्रतिनिधी : ६ आॅक्टोबर
जामखेड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर शताब्दी सभागृहात गौतम बुद्धाच्या मुर्तीस पुष्प अर्पण करून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून काल दि. ६ रोजी अशोका विजयादशमी निमित्त धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या कार्यक्रमासाठी बौध्दाचार्य आशोक आव्हाड, मुकुंद घायतडक, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ कदम, प्रभाकर सदाफुले सर, प्रभाकर घायतडक मेजर, सिध्दार्थ साळवे, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, प्रा. विकी घायतडक, बापूसाहेब गायकवाड, शिवाजी ससाणे, सुरेखा सदाफुले, सुरेखा रत्नाकर सदाफुले, संदेश घायतडक, सचिन सदाफुले आदी मान्यवर उपस्थित होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात पार पडलेल्या कार्यक्रमासाठी पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, वाचनालयाचे अध्यक्ष कबीर घायतडक आदींसह समाजातील विविध मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा, शिक्षणाशिवाय तुमचा उध्दार नाही, अंधश्रद्धा पाळू नका, प्रयत्नवादी रहा, गाडी, बंगला अशा गोष्टींमधे गुंतून जाऊ नका? आपला व समाजाचा धम्माच्या मार्गाने उध्दार होण्यासाठी पुढे या. अशा प्रकारे अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment