जामखेड प्रतिनिधी : ६ आॅक्टोबर
जामखेड नगरपरिषद हद्दीतील जमदारवाडी येथील तरूण अविनाश मारुती आजबे (वय 32 वर्ष) विजचा शाॅक लागून मृत्यू झाला असून मृतदेहावर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे.
याबाबत मयत तरूणाचे चुलते हरीभाऊ नारायन आजबे यांनी दिलेल्या पोलीस खबरे नुसार, आज दि. ६ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ : १५ वा. सुमारास मी आमचे घरी बटेवाडी येथे असताना मला विनोद हनुमान टकले यांचा फोन आला की, तुमचा पुतण्या अविनाथ मारुती आजबे हा बटेवाडी येथिल कांतीलाल अंबादास भिसे यांचे घरा समोर असलेल्या लाईटचे खांबावरुन पडला आहे. त्यास दवाखाण्यात घेवुन जा. असा फोन आल्याने मी लगेच तेथे गेलो तेथे बरेच लोक जमलेले होते. यावेळी माझा पुतण्या अविनाश मारुती आजबे (वय 32 वर्ष) यास पाहिले असता तो करंट लागुन खाली बेशुध्द अवस्थेत पडलेला दिसल्याने, मी त्यास जमलेल्या लोकांचे मदतीने खाजगी रिक्षा मध्ये टाकुन घेवुन औषधउपचारकामी ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे आणले असता तेथिल डॉक्टरांनी त्यास तपासले व तो उपचारापुर्वी मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत हे करत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा