खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५
गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठी कर्जत उपविभागीय दंडाधिकारी नितीन पाटील यांनी खर्डा येथील सराईत गुन्हेगार रोहित ऊर्फ बबलु बाबासाहेब गोलेकर यांना तडीपार करण्याचा आदेश काढला आहे.
हा आदेश भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३(३) नुसार देण्यात आला असून,दि. २६ ऑगस्ट ते दि.७ सप्टेंबर २०२५ दरम्यान बबलू गोलेकर यांना जामखेड तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलेल्या तपशिलांनुसार, रोहित उर्फ बबलु गोलेकर यांचा नेहमीच गुंडसख्या साथीदारासोबत दहशत निर्माण करण्याची सवय असून, त्यांना दखलपात्र व गंभीर स्वरुपाचे गुन्हे करत असल्याचे मानण्यात आले आहे.
तसेच बबलू गोलेकर हे खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील उपस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक वाटते त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्यास करू नये व त्यांचे वरील काळात जामखेड तालुक्याच्या बाहेर इतरत्र निघून जावे .त्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता ते सार्वजनिक उपद्रव्य करून शांतता व सुव्यवस्थेचा भंग करण्याची शक्यता आहे.
असा निष्कर्ष काढून हा प्रतिबंधात्मक आदेश दिला गेला आहे.
उपविभागीय दंडाधिकारी नितीन पाटील यांनी सही करून जारी केलेला हा आदेश कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा