जामखेड प्रतिनधी/२८ ऑगस्ट 2025
अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा उच्छेदन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. या पथकाला स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ हृदय घोडके, पोना श्यामसुंदर जाधव, अमोल कोतकर, प्रकाश मांडगे, अमोल आजबे आणि महादेव भांड यांनी मदत केली. दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी जामखेड तालुक्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पथकास माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील काही आरोपी जामखेड तालुक्यातील राजुरी परिसरात येणार आहेत ,त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून संशयित ५ आरोपींना राजुरी परिसरातून ताब्यात घेतले आहे
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी १)वैभव विजय साबळे (वय २९), २)कल्याण पांडुरंग मोहोळकर वय (२८),३) अभयसिंह किसन राजेभोसले वय (२३), ४)नरेंद्र शहाजी सोनवणे वय (२३)५) साईनाथ संपत राजपुत वय (२१) असे नावे असून हे सर्व जामखेड तालुक्यातील नान्नज येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमांतर्गत विविध कलमांचेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनमध्ये सुरु आहे.
सदरची कारवाई आहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गी, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ हृदय घोडके, पोना श्यामसुंदर जाधव, अमोल कोतकर, प्रकाश मांडगे, अमोल आजबे आणि महादेव भांड यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा