जामखेड प्रतिनिधी/६ऑक्टोबर२०२५
जामखेड रस्त्यावर काल रविवारी दि.५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडलेल्या अपघातात जीप उलटल्याने तीनजण गंभीर जखमी झाले. ही घटना जामखेड शहरालगत कर्जत रस्त्यावर घडली असून, रस्त्यावर अचानक कुत्रे आडवे आल्यानं वाहन चालकाचा तोल जाऊन जीप उलटल्याची माहिती मिळाली आहे.या अपघातात जीप चालक अन्सार हसन शेख (वय ३६, रा. राजुरी, ता. जामखेड), नजीर फकीर मोहम्मद सय्यद (वय ५०) व बाबा कादर शेख (वय ७२, दोघे रा. खडकत, ता. आष्टी) हे तिघे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तत्परता दाखवत आपल्या रुग्णवाहिकेतून जखमींना तातडीने जामखेड सरकारी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती कोठारी यांना तलाठी कार्यालयातील प्रवीण सरोदे व भाऊसाहेब पोटफोडे यांनी दूरध्वनीवरून दिली होती.संजय कोठारी यांनी सहकारी महेंद्र क्षीरसागर यांच्या मदतीने घटनास्थळी जाऊन जखमींना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळवून दिले. सुदैवाने अपघातात जीवितहानी टळली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा