जामखेड प्रतिनिधी - 8ऑक्टोबर2025
लोकशाहीचे चार स्तंभ आहेत; त्यात न्यायव्यवस्था हा मुख्य स्तंभ आहे,सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रतिष्ठेवर होणारा हल्ला देश आणि संविधानावर आहे. थोर विचारवंत, साहित्यिक, राजकीय नेते यांचे प्रतिक्रियाशून्य राहणे चिंताजनक आहे. स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली ही न्यायव्यवस्था जपणे आमचे कर्तव्य आहे.न्यायव्यवस्थेचा अपमान म्हणजे देशावर आघात असे मत वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड डॉ अरुण जाधव यांनी व्यक्त केले.
सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाने बूट फेकल्याप्रकरणी संतापाची लाट उसळली असून आज दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी जामखेड येथे जामखेड येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन तहसील कार्यालय येथे निषेध व्यक्त करत प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांना निवेदन दिले.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले म्हणाले की,हा अपमान फक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचा नाही, संपूर्ण संविधानाचा अपमान आहे. ज्या माथेफिरू वकिलाने बूट फेकून मारला अशा वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.असा अपमान आम्ही कधीच सहन करु शकत नाही.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड.डॉ.अरुण जाधव,सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,भिमटोला ग्रुप अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, लोकाधिकार आंदोलन प्रवक्ते बापूसाहेब ओव्हळ,
माजी सभापती सुभाष आव्हाड, प्रहार चे नय्युमभाई सुभेदार,राजेंद्र सदाफुले,राजन समिंदर,वकील संघाचे अध्यक्ष ॲड.प्रमोद राऊत,युवक काँग्रेस चे राहुल उगले,रासपाचे विकास मासाळ,ॲड.हर्षल डोके,नगरसेवक अमित जाधव, सामाजिक कार्यकर्त्या उमाताई जाधव,मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहर भाई काझी,भानुदास बोराटे,सिध्दार्थ साळवे,हबीब मास्टर,जावेद बारूद,ॲड.कृष्णा शिरोळे ॲड.बाळासाहेब घोडेस्वार,डॉ प्रकाश कारंडे,आतिश पारवे,संतोष थोरात, आदिवासी नेते विशाल पवार,सावकार भोसले,शहाजी डोके,बाबा सोनवणे,रंजन मेघडंबर, शिवाजी ससाणे,विनोद घायतडक,दादा मोरे,शुभम जाधव, अरविंद जाधव,संदीप आखाडे, सचिन सदाफुले,मुकुंद घायतडक,प्रमोद सदाफुले,देवा मोरे, सचिन सदाफुले,अमोल गिरमे,आसिफ शेख, सुर्यकांत सदाफुले,मोईन शेख,रजनी बागवान,राजु शिंदे, स्वप्निल खाडे,अजित घायतडक,प्रतिक निकाळजे,अंकल घायतडक,लखन मोरे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा