जामखेड प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर२०२५
जामखेड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीचे युवा आणि विकासाभिमुख सरपंच रघुनाथ पंढरीनाथ परकड हे आगामी पंचायत समिती निवडणुकीत साकत गनातून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांनी त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित केले.दि.9 मार्च 2025 रोजी अहिल्यानगर येथे पार पडलेल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळ्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या सरपंचांचा गौरव करण्यात आला होता . यावेळी विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी रघुनाथ परकड यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले आणि त्यांचा येथोचित सत्कारही केला.रघुनाथ परकड यांनी लोणी गावात गेल्या काही वर्षांत स्वच्छता अभियान, ग्रामसौंदर्यीकरण, शाश्वत पाणीपुरवठा योजना, पर्यावरण संवर्धन उपक्रम, रस्ते बांधकाम, शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा अशा अनेक प्रकल्पांची यशस्वीरित्या अंमलबजावणी केली. या उपक्रमांमुळे लोणी ग्रामपंचायत तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.“गावाचा विकास हाच माझा ध्यास आहे, काही वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे तर लोणीसारख्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाचा दर्जा उंचावण्यासाठी मी काम करत आहे,” असे मत परकड यांनी पोलिस वारंट न्यूज नेटवर्कशी बोलताना व्यक्त केले.
परकड यांनी पुढे पंचायत समितीच्या माध्यमातून व्यापक पातळीवर विकासाचे उपाय राबवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, ते भाजपाकडून साकत गणाचे इच्छुक उमेदवार असतील अशी माहिती त्यांनी दिली. ग्रामविकासाच्या कामगिरीवर आधारित त्यांची उमेदवारी स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.या निर्णयामुळे साकत गनातील आगामी पंचायत समिती निवडणुकीत चुरस वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा