जामखेड प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील पारेवाडी (अरणगाव) येथील शेतकरी महादेव कुंडलिक राऊत (वय 55) यांनी गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, राऊत हे मागील काही वर्षांपासून सतत कर्जबाजारी होते. यंदा पिकांची पूर्ण नाशवंत नापिकी आणि उत्पन्नातील मोठी घट यामुळे आर्थिक संकट तीव्र झाले होते. त्यातच दिवाळी तोंडावर असल्याने कुटुंबीयांचे खर्च आणि लोकांचे कर्ज फेडण्याची चिंता त्यांना सतावत होती.
महादेव राऊत यांनी आपल्या शेतातील झाडाला दोरी बांधून आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. लगेचच ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे
अतिवृष्टीमुळे या वर्षी परिसरातील सोयाबीन आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांना उत्पादन विक्रीत हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहेत, त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे राऊत यांनीही या नापिकीमुळे वाढत्या कर्जताणाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा