जामखेड प्रतिनधी/11जुलै2025
महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सकाळी एक दु:खद घटना समोर आली. याबाबत पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दि.१० जुलै २०२५ रोजी रात्री त्यांच्या बहिणीला एका फिजिक्स क्लासमध्ये सोडल्यावर ती परत आली नाही. तिच्या शोधासाठी तिची बहिण यांनी वानवडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सुरू झालेल्या तपासादरम्यान, मुलगा आणि मुलीने पुणे शहरातील खडकवासला धरणाजवळ विषारी औषधे सेवन करून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी कळविले.
फिर्यादी यांच्या माहितीनुसार, त्यांची १६ वर्षांची बहिण क्लास संपल्यानंतर परत आली नाही. त्यानंतर तिला कोणीतरी फसवून नेल्याची शक्यता वानवडी पोलिसांसमोर नोंदवली गेली. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अपराध नोंद 278/2025 खाली गुन्हा करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक लोंढे तपास करीत होते .
संशयित मुलगा संतोष बाळासाहेब कळसाईत सध्या रा.महादेव नगर मांजरी मूळचे राहणार रावळगाव तालुका कर्जत जि. अहिल्यानगर याचा सुद्धा शोध घेतला जात होता. त्याचा फोन संध्याकाळपासून बंद असल्याने त्याचा पत्ता शोधण्यात पोलीस अंमलदार गुंतले होते. उत्तम नगर पोलिसांनी कळविले की दोघांचे मृतदेह खडकवासला धरणाजवळ आढळला आहे.
सदर प्रकरणाचा तपास सुरु असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा