जामखेड प्रतिनधी/16 मे2025
जामखेड येथे स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडील मालमत्ता चोरण्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की.फिर्यादी राजेंद्र दिलीप मैड यांना 150 ग्रॅम सोने आणि 10 लाख रुपये स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून दि 14/5/2025 रोजी फिर्यादीस कुसडगाव तालुका जामखेड येथे बोलावले फिर्यादी पैसे घेऊन आल्यानंतर यातील महिला आरोपी अश्विनी व तिचे 8 ते 10 साथीदारांनी फिर्यादीस मारहाण करून त्यांचे कडील दहा लाख रोख रुपये रक्कम सोन्याचे दागिने व मोबाईलचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला याबाबत जामखेड पोलीस स्टेशनला 266 /2025 बीएनएस 310 (2) प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याबाबत माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तपास पथके नेमून गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी गुन्हे शाखा व तपास पथकाला आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले. पथकाने दि 15/05/2025 रोजी पथक जामखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आरोपीचा शोध घेत असताना जवळा, ता. जामखेड येथे आरोपींचा शोध घेऊन यातील काही आरोपींना ताब्यात घेतले आहे.त्यांच्या विचारपूसीतून गुन्ह्यातील इतर फरार आरोपींची माहिती मिळाली आहे. ताब्यातील आरोपीमध्ये १)सोन्या शिवाजी काळे,वय 28 2)अभित्या शिवाजी काळे वय 32,3) शुभम रामचंद्र पवार वय18 राहणार सरदवाडी, ता.जामखेड जि. आहिल्यानगर या आरोपींना ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना विश्वासात घेऊन गुन्हाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा 4)विकास काज्या काळे(फरार) 5) जेरणी विकास काळे (फरार) 6,) लालासाहेब काजा काळे( फरार) ,7) किरण काजा काळे**(फरार), अ.क्र.4 ते 7 रा पोंदेवाडी , ता.करमाळा,जि. सोलापूर असे आहेत.
8)वनिता रामचंद्र पवार ,रा सरदवाडी,ता जामखेड(फरार) 11) रेश्मा सुनील काळे राहणार सरफडोह तालुका करमाळा जिल्हा सोलापूर (फरार) अशांनी मिळून केला असल्याची माहिती सांगितली ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या तपास कामे जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून
गुन्ह्याचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. गुन्ह्यातील काही आरोपी अद्याप फरार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा