खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५
खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न झाल्याने एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खर्डा येथील शुक्रवार पेठमध्ये दि १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी अंदाजे १:३० वाजता घडली असून मृत्यूचे कारण उघडकीस आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ज्योती योगेश भैसडे यांनी खर्डा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार, त्यांचे पती योगेश उर्फ बाल्या भैसडे यांनी आरोपींच्या वडिलांना आजारपणासाठी तब्बल २० लाख रुपये दिले होते. तथापि परतफेड करण्याऐवजी आरोपींनी वारंवार धमक्या दिल्या. "पैसे मागायला आलास तर अंगावरचे कपडे फाडून तुझ्याविरोधात आॅट्रोसिटीची तक्रार नोंदवीन" असा इशारा पतीस देण्यात आल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.
या सततच्या त्रासाला कंटाळून योगेश भैसडे यांनी स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गु.र. नं. 136/2025 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 108, 351(2)(3), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी रुपा विष्णु काळे, रोहन उर्फ सोमा विष्णु काळे आणि रोहित विष्णु काळे (रा. खर्डा, ता. जामखेड) यांची नावे नमूद आहेत. यामधील रुपाली काळे व रोहन काळे यांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी रोहित काळे अद्याप फरार आहे.
घटनेचा तपास खर्डा पोलीस ठाण्याचे सपोनि उज्वलसिंह राजपुत करत आहेत. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण लोखंडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे.

कोट
या प्रकरणातून स्पष्ट होते की आर्थिक ताणतणाव आणि कर्जाच्या वसूलीच्या ताणाने कुटुंबीयांमध्ये गंभीर वाद निर्माण होऊन गंभीर परिणाम घडू शकतात. सामाजिक दृष्टीने या घटनेने आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी याकडे लक्ष वेधले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा