सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025
सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वैरागमध्ये माजी उपसरपंचाने नर्तिकेच्या प्रेमात आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता माढा तालुक्यातील वेणेगाव येथे जय मल्हार कलाकेंद्रासमोर थेट गोळीबाराची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कलाकेंद्रात एकाच बारीवर बसण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद चिघळताच भांडण झाले आणि त्यातून एका तरुणाने पिस्तुलातून गोळीबार केला. या घटनेत देवा बाळु कोठावळे (रा. वाखरी, पंढरपूरजवळ) गंभीर जखमी झाला असून त्याला पायाला गोळी लागली आहे.
घटनेनंतर टेभुर्णी पोलिसांनी तातडीने पिस्तुल जप्त केले. सुरज पवारसह अन्य तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू आहे. मात्र, नेमका गोळीबार कोणी केला हे पोलिसांनी अद्याप जाहीर केलेले नाही.
सलग दोन दिवसांत वैराग आणि वेणेगाव येथे झालेल्या धक्कादायक घटनांमुळे सोलापूर जिल्ह्यात भीतीचे वातारवण निर्माण झाले असून ही गुन्हेगारीची धोक्याची घंटा ठरत असल्याची चर्चा सुरू आहे.
शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५
कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
Tags
# क्राईम बातम्या
About Unknown
क्राईम बातम्या
Labels
क्राईम बातम्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड
संपादिका-सा.पोलीस वारंट
मो नंबर-९९७०५२९६९७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा