मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा! - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

Home राजकीय बातम्या मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

मंगळवार, ऑक्टोबर २१, २०२५ राजकीय बातम्या,


जामखेड प्रतिनिधी/ 22ऑक्टोबर

अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झालेल्या मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झाली असून, त्यामुळे खर्डा परिसरासह आसपासच्या गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तथापि, या कामाच्या श्रेयावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे.मोहरी तलाव हा जामखेड तालुक्यातील खर्डा, मोहरी, तेलंगशी, जायभायवाडी यांसह दहा गावांचा प्रमुख जलस्रोत आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तलावाच्या सांडव्यात आणि भराव भागात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. पाणी बाहेर पडल्याने गावांपुढे गंभीर संकट निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच आमदार रोहित पवार सकाळी सात वाजता घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्वखर्चातून पोकलेन मशीन उपलब्ध करून दिले आणि तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या. त्यांनी जलसंपदा विभागाकडे स्वखर्चातून दुरुस्तीची परवानगी मागितली आणि सततचा पाठपुरावा केला, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.तर भाजपा पदाधिकारी रवी सुरवसे यांनी “रोहित पवारांनी आणलेले मशीन आणि सिमेंट प्रत्यक्षात वापरले गेले का?” असा सवाल उपस्थित करून राष्ट्रवादीवर केवळ दिखाव्याचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे.
 या वक्तव्यामुळे परिसरातील चर्चांना आणखीनच उधाण आले आहे.दरम्यान, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तलाव स्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. मात्र नागरिकांच्या मते, तलावातील अर्ध्याहून अधिक पाणी वाहून गेल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी सांगितले,“तलाव फुटल्याची माहिती मिळताच आमदार रोहितदादा पवार घटनास्थळी धावले. त्यांचा तातडीचा निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हे काम शक्य झाले.”सध्या जलसंपदा विभागाकडून तात्पुरती दुरुस्ती सुरू असून, उरलेले पाणी साठवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. हे काम वेळेत पूर्ण झाले नाही,
 तर आगामी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा धोका असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.मोहरी तलावाचे दुरुस्ती काम सुरू झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळालेला असला, तरी श्रेयवादाच्या राजकारणामुळे हा संवेदनशील विषय पुन्हा एकदा खर्डा व जामखेडच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at मंगळवार, ऑक्टोबर २१, २०२५
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

Popular Posts

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *