जामखेड प्रतिनिधी : १९ ऑगस्ट
आपला देश विकसनशील देश आहे. जर आपल्याला विकसित देश म्हणून पुढे यायचे असेल तर देशाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर शिक्षण क्षेत्राकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. यासाठी जागतिक दर्जाच्या शिक्षण व्यवस्थेप्रमाणे शिक्षण व्यवस्था मजबूत करणे करजेचे आहे. असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. सुधिर तांबे केले.
जामखेड येथिल ल. ना होशिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता आपल्या आमदार निधीतून दोन लाख रूपये किमतीचा एल. ई. डी. प्रोजेक्टर दिला. त्याचे उद्घाटन आ. सुधर तांबे यांच्या हस्ते करण्यात यावेळी ते बोलत होते.
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, ल. ना. होशिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकांत होशिंग, युवक कार्यकर्ते राहुल उगले, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, उपप्राचार्य पोपट जरे, पर्यवेक्षक रमेश अडसूळ, समारंभ विभाग प्रमुख नरेंद्र लहाने सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. सुधिर तांबे म्हणाले, शिक्षण हा सर्वोच्च प्राधान्याचा विषय असला पाहिजे. राज्यातील शिक्षकांच्या विद्यापीठ पातळीपासून प्राथमिक शिक्षणापर्यंत शिक्षकाच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर व पारदर्शकपणे तसेच वर्षातून १-२ वेळा शिक्षक भरती झाली पाहिजे. विना अनुदानित पध्दत बंद होऊन पुर्ण अनुदानावर शिक्षक भरती केली पाहिजे. खासजी असो की शासकीय मराठी माध्यमातून किमान १२ वी पर्यंत सर्वांना शिक्षणासाठी १००% अनुदान मिळणे आवश्यक आहे.
आपल्या राज्यात शिक्षणावर जी. डी. पी. च्या सहा टक्के खर्च करणे अपेक्षित असताना फक्त तीन टक्केच खर्च केला जातो. पेन्शन, वाढीव पदे, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नाबाबतही शासनाने गंभीरपणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. यासह अनेक विषयांचा आ. तांबे यांनी आढावा घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. टी. गायकवाड यांनी तर आभार पोपट जरे यांनी मानले
No comments:
Post a Comment