कर्जत- जामखेड तालुक्यातील सर्व pm किसान योजने अंतर्गत येणारे लाभार्थी शेतकरी यांनीआपला लाभ चालू ठेवण्यासाठी e-KYC/आधार लिंकिंग करणे आवश्यक आहे. अन्यथा PM किसान योजनेचा 12 वा हप्ता वितरित होण्यास अडचण येऊ शकते.
याबाबत जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले आहे की, PM किसान योजनेचा लाभ मिळत असलेल्या शेतकऱ्यांनी आपला लाभ पुढे सुरू ठेवण्यासाठी PM किसान अँप डाउनलोड करावे (त्याची लिंक खाली दिली आहे) किंवा जवळच्या नागरी सुविधा केंद्रात जाऊन अपडेट करू घेऊ शकतात. दि. ३१ ऑगस्ट २०२२ पूर्वी आपण e-KYC/आधार लिंकिंग न केल्यास आपल्याला १२ हप्ता मिळण्यासाठी अडचण येऊ शकते. तरी तातडीने आपले PM किसान e-KYC/आधार लिंकिंग करून घ्यावे. असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.
PM किसान ॲप लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.project.pmkisan
No comments:
Post a Comment