जामखेड प्रतिनिधी :
पाटोदा, जिल्हा बीड तालुक्यातील, हनुमानगड येथील मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले बद्दल गुन्हा दाखल होऊन तब्बल १० दिवस उलटूनही आरोपीस अटक करण्यात खर्डा पोलीसांना यश येत नसल्याने पोलीसांबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे आहे. मठाधिपती बुवासाहेब खाडे यांनी दाखल केलेल्या गुन्हयातील आरोपी भेटले मात्र गंभीर गुन्ह्यातील व जखमी असलेला मठाधिपती का सापडत नाही असा सवाल विचारला जात आहे. जर आरोपी सापडत नसेल तर खर्डा पोलीसांकडून तपास काढून घेऊन गुन्हे अन्वेषण किंवा इतर विभागाला द्यावा अशी मागणी होत आहे. ..
जामखेड तालुक्यातील मोहरी येथील महिलेने दि. ४ आॅगस्ट रोजी सोन्याच्या दागिन्याचे तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून संमतीशिवाय आरोपी बुवासाहेब जिजाबा खाडे याने वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. वगैरे मजकूरचे फिर्यादीवरून आरोपी बुवासाहेब खाडे विरोधात भा. द. वि. कलम. 376 (N),506 गुन्हा दाखल केला आहे. मात्र आज दि. १४ आॅगस्ट रोजी दहा दिवस होऊनही आरोपी सापडत नसल्याने सदर महिला व तिचे कुटुंब भयभीत झाले आहे. या गुन्ह्याचा तपास खर्डा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करत आहेत.
दरम्यान मठाधिपती खाडे यांनी आपल्याला मारहाण करून सोन चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील २४ तोळे हस्तगत करून आरोपीही अटक केले. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली. मात्र जखमी अवस्थेतील महाराज खर्डा पोलीसांना का सापडत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
No comments:
Post a Comment