कर्जत जामखेडचे कार्यकुशल आमदार आ.रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत-जामखेडच्या वतीने दि. २२ आॅगस्ट रोजी जामखेड येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेचे प्रथम बक्षीस १ लाख ११११ रूपये ठेवण्यात आले आहे.
दि. २२ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५: ०० वाजता जामखेड शहरातील श्री. नागेश विद्यालय या विद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या स्पर्धेसाठी जय मल्हार या मालिकेतील बानू या भुमीकेतील लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर ह्या उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९६९६३३०३३० नंबरवर काॅल करून स्पर्धकांनी आपली नोंदणी करायची आहे. तसेच या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment