खर्डा प्रतिनिधी : १७ ऑगस्ट
खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे यांनी व्यक्त केले.
सन १९७८ साली खर्डा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले, त्यासाठी स्व. लालखॉं पंजाबी यांनी सोनेगाव रस्त्यालगतची आपल्या मालकीची २ एकर जमीन दान केली होती. या लोकोपयोगी कामासाठी स्व. लालखॉं अहमदखॉं पंजाबी यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खर्डा ग्रामस्थांच्या वतीने
कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात येतो. आज दि. १७ आॅगस्ट रोजी आयोजित सोहळ्यात स्व. पंजाबी यांच्या प्रतिमेचे पूजन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील, प्रकाश गोलेकर, गणेश शिंदे, बाजीराव गोपाळघरे, टिल्लू पंजाबी, चंद्रकांत गोलेकर, नानासाहेब गोपाळ घरे, राजेंद्र गोलेकर, ज्ञानेश्वर इंगोले, राजू लोंढे, संतोष गोपाळघरे, बबलू सुरवसे, शाहरुख शेख, बाळू सकट, सामाजिक कार्यकर्ते दत्तराज पवार शकूर शेख, राजू डोके, आरोग्य कर्मचारी रणसिंग,पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल शेषराव मस्के इत्यादी सह खर्डा ग्रामस्थ उपस्थित होते..
यावेळी पुढे बोलताना रवि सुरवसे म्हणाले की, १९७८ साली खर्डा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले. त्यासाठी स्व. लालखा पंजाबी यांनी यासाठी सोनेगाव रस्त्यालगतची स्वतःच्या मालकीची २ एकर जमीन दान केली होती. म्हणून या भागातील लोकांना आजपर्यंत रुग्णसेवेचा लाभ मिळत आहे. याठिकाणी उभी राहात असलेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी माजी मंत्री व आमदार राम शिंदे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या ठिकाणी आज सुसज्ज अशी इमारत उभी राहिली आहे. पुढील काळात या ठिकाणी डॉक्टर व जास्तीत जास्त आरोग्य कर्मचारी यांची नेमणूक करण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रवि सुरवसे यांनी सांगितले.
यावेळी सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, सुनील लोंढे, वैजिनाथ पाटील, संजय गोपाळघरे, बाळासाहेब शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन व आभार ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे यांनी मानले.
No comments:
Post a Comment