खर्डा प्रतिनिधी : ११ आॅगस्ट
खर्डा येथील जूनी ग्रामपंचायतच (कमीटी) च्या बाजूला होत असलेले अतिक्रमण व बांधकाम त्वरित हटवावे अशी मागणी सुजीत सुभाष पवार यांनी केली आहे.
याबाबत खर्डा ग्रामपंचायत प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खर्डा येथील जूनी ग्रामपंचायत (कमीटी) परिसरात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत अतिक्रमण आहे. यातच आता या ठिकाणी पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले जात आहे. यामुळे चारचाकी व दुचाकी वाहनांना ये जा करण्यात मोठी अडचण होत आहे. तसेच यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामुळे नागरिकांना मोठया अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी दररोज भाजी बाजार भरत असतो त्यासही मोठा अडथळा होण्याची शक्यता आहे. तसेच खर्डा वेशीतून मुख्य बाजारपेठत जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे. या अतिक्रमणामुळे नागरिक व वाहनधारकांमध्ये मोठा संताप आहे. यामुळे काही अनुचित प्रकारही होण्याची शक्यता आहे. तरी खर्डा ग्रामपंचायत प्रशासनाने जनभावना लक्षात घेऊन त्वरित हे अतिक्रमण व बांधकाम हटवावे अशी मागणी सुजीत सुभाष पवार यांनी निवेदनाव्दारे ग्रामपंचायत प्रशासनास केली आहे.
No comments:
Post a Comment