उध्या दि. २३ आॅगस्ट रोजी खर्डा या ठिकाणी होणाऱ्या शिबीरामध्ये मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
विजयसिंह गोलेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून खर्डा परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या कामाला नेहमीच धाऊन जाणारे एक तरूण नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. माजी पंचायत समिती सदस्य म्हणून काम करताना त्यांनी खर्डा परिसरात अनेक विकास कामे केली आहेत. तसेच खर्डा पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास कृती समितीचे अध्यक्ष म्हणून खर्डा भुईकोट किल्ला, बारा ज्योतिर्लिंग, सिताराम गड तसेच खर्डा परिसरातील सर्वच ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा विकास होऊन खर्डा परिसरातील पर्यटन वाढून त्या माध्यमातून रोजगार निर्माण व्हावा यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा सुरू असतो. त्यामाध्यमातून खर्डा व परिसरात अनेक कामे सुरू तर अनेक कामे प्रस्तावित आहेत.
कर्जत-जामखेड कार्यकुशल आमदार आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून खर्डा व परिसरात मोठे काम करण्याचा संकल्प असून त्यामाध्यमातून विजयसिंह गोलेकर यांचा नियोजितपणे मोठा जनसंपर्क असल्याचे दिसून येत आहे.
उद्या दि. २३ आॅगस्ट रोजी खर्डा येथिल डॉ. लाड हाॅस्पिटल येथे सकाळी ११:०० वाजता होणाऱ्या रक्तदान शिबीरात मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment