जामखेड प्रतिनिधी/6 ऑक्टोबर2025
तालुक्यातील आदर्श प्राथमिक शिक्षक, साहित्यिक ,बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड यांचा मुलगा अविष्कार (सोनू) गायकवाड
याचे काल रात्री इस्लामपूर, सांगली येथे अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. त्याचा अंत्यविधी आज सायंकाळी ६ : ०० वाजताचे दरम्यान जामखेड शहरातील तपनेश्वर स्मशानमुमी येथे होणार आहे. या घटनेने जामखेड तालुक्यातील संपुर्ण आंबेडकरी समाज हळहळला असून तालुक्यातील सर्वच स्तरावरून अविष्कार (सोनू) गायकवाड यास श्रध्दांजली अर्पण केली जात आहे.
दिवंगत अविष्कार (सोनू) गायकवाड याचे वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदवीचे शेवटचे केवळ सहा महिने राहिले असताना काळाने त्याच्यावर झडप घातलीय. गोकुळ गायकवाड दोन्ही मुलांना अत्यंत कष्टाने, जिद्दीने शिकवले. हा छोटा मुलगा सोनू लहानपणापासून अत्यंत चाणाक्ष, हुशार राहिलेला होता.
त्याच्या अकाली जाण्याने सरांची केवळ वैयक्तिक हानीच झाली नाही तर समाजाचेही कधीही भरून न येणारे अपरिमित नुकसान झाले आहे.
या दु:खातून सावरण्याचे बळ जगातील कोणतीही शक्ती देऊ शकत नाही तथापि मी बुद्धां चरणी प्रार्थना करतो की हे दु:ख काहीसे कमी होवो. अश्या भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा