अहिल्यानगर प्रतिनधी/२७ मार्च२०२५
आहिल्यानगरहून पुण्याकडे कारने जात असलेल्या एका कुटुंबाची दुर्दैवी कहाणी समोर आली आहे. अहिल्यानगर तालुक्यातील चास गावाजवळील एका बंद पेट्रोल पंपावर लघुशंकेसाठी थांबलेल्या या कुटुंबावर दोघांनी केला आहे डोळ्यात मिरची पूड टाकून हल्ला केला. चालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला गंभीर जखमी करण्यात आल्यानंतर, कुटुंबाच्या महिलांच्या गळ्यातील सुमारे ८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटले गेले.
ही घटना मंगळवारी पहाटे ३:३० च्या सुमारास घडली. या कुटुंबात भाऊसाहेब मोघाजी भोजणे (वय ५५, रा. जालना, हल्ली रा. बाणेर, पुणे) यांनी अहिल्यानगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलगी, दोघी लहान मुले आणि कारचालक होते. जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेले भोजणे हे त्यांच्या मूळगावी गेले होते आणि त्यानंतर २५ मार्चला पहाटे नगर मार्गे पुण्याकडे मारुती वॅगन आर कारने परतत होते. चास शिवारात येण्यासाठी त्यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी करून लघुशंकेसाठी खाली उतरले तेव्हा ही घटना घडली असून एका चोरट्याने चालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकल्यानंतर, दुसऱ्या चोरट्याने कुटुंबाला जखडून ठेवत धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिने लुटले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा