नेवासा प्रतिनधी/२७ मार्च२०२५
आहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलिसांनी सलाबतपुर गावात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली आहे. सदर घटना २७ मार्च २०२५ रोजी दुपारी १२ वाजता घडली असून यामध्ये मुख्य आरोपी मुकेश अशोक लष्करे याला ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी सलाबतपुर गावात सापळा रचून वाहन अडविले, ज्यानंतर त्यांनी तीव्र तपासणी केली आणि वाहनातून २ पेक्षा जास्त ब्रास अवैध वाळू जप्त केली आहे तसेच वाहनचालकास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव मुकेश अशोक लष्करे, वय ३० वर्षे, रा. मुर्कीदपुर ता. नेवासा जि. अहिल्यानगर असे सांगितले तसेच सदरचे वाहन व वाळु कोणाची व कोठुन आणली याबाबत त्याने काहीएक माहिती दिली नसुन सदरचे वाहन ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन नेवासा येथे आणुन सदर वाहनासह गौणखनिज वाळुचा एकुण १४,९०,०००/-रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला असुन सदर
वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे, नेवासा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी निरनिराळे तपशील घेत तपास सुरू केला आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने, अवैध वाळू वाहतूकवर कठोर कारवाई करण्याचा पोलीसांचा इरादा आहे. पोलिसांच्या ह्या कारवाईने अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूकीवर कडक आघाडी घेण्याची संदेश दिला आहे.
सदरच्या कारवाईमुळे नेवासा हद्दीतील अवैद्य धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदरची कारवाई आहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपुर व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील शेवगाव यांचे सुचना व मागदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे व धंनजय जाधव पोलीस निरीक्षक यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल अप्पासाहेब तांबे, सुमित करंजकर, श्रीनाथ गवळी, जालींदर दहिफळे यांनी केली आहे.
कोट
नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अशाच प्रकारे अवैध वाळु चोरी, अवैध रित्या वाळुची चोरटी वाहतुक करणारे, अवैध धंदे चालकांवर छापेमारी करुन कठोर कारवाई करण्यात येणार असून ज्या व्यक्तींवर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत त्यांच्याविरुध्द हद्दपार सारखी कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढेही अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर कारवाई चालु राहणार आहे असल्याची माहिती नव्याने रुजू झालेले पोलीस उपअधीक्षक संतोष खाड़े यांनी सांगितली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा