खर्ड्यातील मुस्लिम मदारी वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभापती प्रा.राम शिंदे यांनी घेतला पुढाकार,सोमवारी विधानभवनात बोलावली आढावा बैठक : दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार ? - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

Home राजकीय बातम्या खर्ड्यातील मुस्लिम मदारी वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभापती प्रा.राम शिंदे यांनी घेतला पुढाकार,सोमवारी विधानभवनात बोलावली आढावा बैठक : दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार ?

खर्ड्यातील मुस्लिम मदारी वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभापती प्रा.राम शिंदे यांनी घेतला पुढाकार,सोमवारी विधानभवनात बोलावली आढावा बैठक : दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार ?

शुक्रवार, फेब्रुवारी १४, २०२५ राजकीय बातम्या,

पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१४फेब्रुवारी २०२५
फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारातून जामखेड तालुक्यातील खर्डा येथे मुस्लीम मदारी समाजासाठी विशेष बाब म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत राज्यातील पहिली वसाहत मंजूर करण्यात आली होती. सदर वसाहतीचे काम मागील पाच वर्षे रखडले. परंतू आता मदारी वसाहतीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी पुन्हा पुढाकार घेतला आहे. शिंदे यांच्या पुढाकारातून सोमवारी विधानभवनात मदारी वसाहत कामकाज आढावा बैठक बोलाविण्यात आली आहे. पाच वर्षे कोणामुळे काम रखडले ? कोणी दिरंगाई केली ? त्यांच्यावर काय कारवाई याकडे आता जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे. 
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे मुस्लीम मदारी समाजाची मोठी लोकवस्ती आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे या समाजाचा पारंपारिक सापांच्या खेळासह जादूचे प्रयोग करणे हा उदरनिर्वाहाचा मार्ग पूर्णतः बंद आहे. भंगार गोळा करणे, गोधडी शिवणे व प्रसंगी भीक मागून हे लोक जगतात. हक्काचा निवारा नसल्याने त्यांचा संसार आजही उघड्यावर आहे. बाजार ओट्यांवर पाल टाकून राहणाऱ्या या कुटूंबातील महिला व बालकांचे अतोनात हाल होत असल्याने सदर समाजाला हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी प्रा राम शिंदे यांनी फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असताना विशेष पुढाकार घेतला होता. शिंदे यांच्याकडे भाजपा नेते रविंद्र सुरवसे व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. 

मुस्लिम मदारी या भटक्या समाजाला हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा याकरिता 'मदारी विकास पॅटर्न' राबवण्यात आला होता. या माध्यमांतून या समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला होता. त्याचबरोबर तत्कालीन मंत्री तथा विद्यमान विधान परिषदेची सभापती प्रा. राम शिंदे यांनी तात्कालीन तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत मुस्लिम मदारी समाजासाठी विशेष बाब म्हणून वीस घरांची वसाहत मंजूर करून आणली होती. मदारी वसाहत व तेथील मूलभूत सुविधांसाठी ८८ लाख २ हजार एवढ्या रकमेला त्यावेळी त्यांनी मान्यता मिळवली होती. २०१९ मध्ये या कामाचे भूमिपूजन तत्कालीन पालकमंत्री प्रा राम शिंदे व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडले होते. त्यानंतर कामास प्रारंभ झाला होता. 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मदारी वसाहतीच्या कामाला गती मिळाली नाही. काम बंद राहिले. आमदार रोहित पवार यांना सदर काम मार्गी लावण्यात सपशेल अपयश आले. महाविकास आघाडी सरकार कोसळून युतीचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर मदारी वसाहतीच्या कामास जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा प्रा राम शिंदे यांनी या कामासाठी मदत केली. परंतु गतवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीत येथील अपूर्ण घरांचीही पडझड झाली. घरांची पडझड झाल्याची बाब समजताच प्रा राम शिंदे यांनी नुकसानीची माहिती घेत मदतीसाठी प्रशासनाला सुचना केल्या होत्या. 

यशवंतराव चव्हाण मुक्त योजनेंतर्गत खर्डा येथील मदारी वसाहतीचे काम रखडल्यामुळे मुस्लिम मदारी समाजातील नागरिकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न सध्या अपुर्ण आहे. सदर काम बंद आहे. सदर काम सुरु व्हावे. वंचित उपेक्षित घटकातील मदारी समाजाच्या हक्काच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी होत आहे. सदर प्रश्नाकडे माध्यमांनी लक्ष वेधताच विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी मदारी वसाहतीच्या कामकाजाबाबत तातडीची आढावा बैठक बोलावली आहे.

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या दालनात मदारी वसाहत कामकाज आढावा बैठकीचे सोमवार १७ रोजी विधान भवनात आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक दुपारी १२.०० वाजता कक्ष क्र. ०२०, तळ मजला, विधान भवन, मुंबई येथे संपन्न होणार आहे. या बैठकीत मोठी खडाजंगी होण्याची शक्यता आहे. पाच वर्षे कोणामुळे काम रखडले ? त्यास कोणते अधिकारी जबाबदार ? ज्यांनी दिरंगाई केली त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार ? याकडे आता संपूर्ण जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, मदारी वसाहतीच्या प्रश्नाबाबत होणाऱ्या आढावा बैठकीत खर्डा येथील मदारी समाजातील बांधवांच्या हक्काच्या निवाऱ्याच्या प्रश्नातील अडचणी दुर होऊन सदर कामास पुन्हा गती मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

चौकट

खर्डा येथील वंचित उपेक्षित घटकातील मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु आहे. पालात राहणाऱ्या या समाजाला हक्काचा निवारा मिळावा याकरिता तत्कालीन मंत्री तथा विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला होता. त्यावेळी प्रा राम शिंदे साहेबांनी विशेष बाब म्हणून मदारी वसाहत मंजुर केली होती. परंतू महाविकास आघाडी सरकार आल्यावर आमदार रोहित पवार यांना सदर काम मार्गी लावण्यात सपशेल अपयश आले. परंतू आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आमचे नेते प्रा राम शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या सोमवारी मागास बहुजन कल्याण मंत्री व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत विधानभवनात बैठक होणार आहे. मदारी समाजाला प्रा राम शिंदे साहेब हेच न्याय देऊ शकतात. त्यांच्याच पुढाकारातून मदारी वसाहतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 
 * - रविंद्र सुरवसे, माजी उपसभापती, जामखेड*
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at शुक्रवार, फेब्रुवारी १४, २०२५
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या
    जामखेड प्रतिनिधी –21ऑक्टोबर चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या...
  • लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक
    जामखेड प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीचे युवा आणि विकासाभिमुख सरपंच रघुनाथ पंढरीनाथ परकड हे आगा...
  • मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!
    जामखेड प्रतिनिधी/ 22ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झालेल्या मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झा...
  • समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन
    जामखेड प्रतिनधी/२१ऑक्टोबर२०२५ जामखेड 11 नंबर वॉर्डमधील नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते पै.सागर भाऊ टकले य...
  • खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
    खर्डा,प्रारतिनधी /17जून2025 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील न्यु इंग्लिश स्कूलजवळ आज दिनांक 17 जून, 2025 रोजी दुपारी 1:10 वाजता आ...
  • “‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ — भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद,मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून जलसंपदा विभागाला तातडीचे आदेश
    खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व ...
  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी
    खर्डा, १८ जून 2025 जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील वार्ड क्रमांक १ मधील पारधी वस्तीतील नागरिक आपल्या त्वरित नागरी सुविधांसाठी...
  • दि .18 जूनपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन सर्वेमध्ये सहभाग घ्या ; बाजीराव गोपाळघरे यांचे जामखेड तालुक्यातील नागरिकांना आवाहन
    जामखेड प्रतिनधी/१५जून २०२५ जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेस...
  • अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर स्थानिकांना टोलमाफी आणि अंडरपास/ओव्हरपासच्या मागणीची केंद्राकडून दखल,आमदार रोहित पवार यांनी केली होती मागणी
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३सप्टेंबर अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी आणि सुरक्षिततेच्या दृष्...

Popular Posts

खर्डा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विविध उपक्रमांनी साजरी

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

धक्कादायक हत्या: चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची कुऱ्हाडीने सपासप वार करत केली हत्या; नंतर आत्महत्येचा प्रयत्न

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

जामखेडच्या खताच्या दुकानात मोठी चोरी, ३ लाखांचा माल गायब

धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल

आ. रोहित पवार यांच्याकडून स्वखर्चातून मोहरी तलावाच्या दुरुस्तीची तयारी, कुकडी व सीना कालवा आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाकडे निधीची मागणी,जलसपंदा विभागाने दिले कार्यवाहीचे आदेश

जिल्ह्यातील अवैध धंद्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचा आळा – संगमनेर-मिरजगाव-लोणी परिसरात अवैध धंद्यावर धडक!दोन दिवसांत 9 ठिकाणी छापे – 12 आरोपी अटक, 4.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

खर्डा परिसरात अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला– रहस्यमय घटनेचा तपास सुरू, परिसरात एकच खळबळ

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *