जामखेड तालुक्यातील खर्डा येथील न्यु इंग्लिश स्कूलजवळ आज दिनांक 17 जून, 2025 रोजी दुपारी 1:10 वाजता आरोपी व्यक्ती द्वारे कत्तलीसाठी प्राणी बळजबरीने घेऊन जाण्याचा प्रयत्न खर्डा पोलिसांनी अटकाविला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी अजिम अब्दुल पठाण (वय 25 वर्षे, राहणारा गराडा गल्ली, भुम, जिल्हा धाराशीव) याने महेंद्रा कंपनीच्या पिकअप नंबर MH-25-AJ-2687 वाहनातून चार जर्सी जातीच्या मादी गायी कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, आहे. प्राण्यांची किंमत सुमारे 1,10,000 रुपये असून, वाहनाची किंमत 3,00,000 रुपये आहे. एकूण 4,10,000 रुपयांची मालमत्ता गुन्ह्यात सापडली आहे.
खर्डा पोलीस ठाण्याचे अधिकारी व स्थानिक पोलिस दल घटनास्थळी उपस्थित राहिले. त्यांनी प्राण्यांची सुटका केली व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 च्या कलम 5(अ) आणि 5(ब), तसेच प्राण्यांना छळ प्रतिबंध अधिनियम 1960 च्या कलम 3 आणि 11 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सध्या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपी व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, तपासी अधिकारी या बाबतीत आवश्यक ती चौकशी करीत आहेत. सदर कारवाई खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उजवलसिंह राजपूत यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस करीत आहेत.
खर्डा,प्रारतिनधी /17जून2025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा