जामखेड प्रतिनधी/१५जून २०२५
जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाइन सर्वेमध्ये सहभागी होण्याची शेवटची संधी राहिली आहे. अधिकृत अहवालांनुसार, या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जून 2025 असून, घरकुल अर्ज न केल्यास घरकुलाच्या मदतीपासून वंचित राहणे भाग पडू शकते.
भारत सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत, निराधार आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळते. ही योजना जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावात चालू असून, सर्व पात्र नागरिकांनी ऑनलाइन सर्वेमध्ये सहभागी होण्यासाठी 18 जूनपर्यंत वेळ दिला असून जामखेड तालुक्यातील घरकुलापासून वंचित असणाऱ्या नागरिकांनी दि 18 जून 2025 पर्यंत ऑनलाइन सर्व्हे करून घ्यावेत असे आवाहन भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी केली आहे. ते म्हणाले, “जामखेड तालुक्यातील सर्व गावांमधील घरकुलापासून वंचित नागरिकांनी ऑनलाइन सर्वे करून घ्यावे. या स्वरूपात मुदतवाढ झाली असून, योजनेचा लाभ घेण्यासाठी काळजी घ्यावी.” तसेच घरकुल योजनेत मुदतवाढ केल्याबद्दल भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे आभार मानले आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत, पात्रता नसणारे, कच्चे घर असणारे किंवा निराधार असणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा मुख्य उद्देश आहे, प्रत्येकाला स्वतःचे घर मिळावे, हे सुनिश्चित करणे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील घरकुलापासून वंचित असणाऱ्या नागरिकांनी दि 18 जून 2025 पर्यंत ऑनलाइन सर्व्हे करून घ्यावेत.
भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपळघरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा