जामखेड प्रतिनिधी/६जुलै२०२५
पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे दि.४ जुलै रोजी दुपारी सुमारे सहा वाजताच्या सुमारास सावत्र दीराने सावत्र भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने जबरदस्त हल्ला केला, ज्यामुळे ही महिला घटनास्थळीच ठार झाली. ही घटना एका कौटुंबिक वादातून झाली असून, बहिणीच्या नृत्य करण्याच्या गैरसमजामुळे ही हिंसा घडली आहे.
या घटनेने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सावत्र दिराला ताब्यात घेतले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेमा आकाश काळे (वय ३५) असे खून झालेल्या भावजयीचे नाव असून ४ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या दरम्यान करकंब येथे टेंभी रोडजवळ (ता. पंढरपूर) ही घटना घडली. आकाश बिंदुल काळे (ता. पंढरपूर) हा पत्नी हेमा, मुलगा प्रथमेश, आमेश, हिमेश, प्रेम, रॉकी व मुलगी आरिना एकत्र राहतात. आकाश हा साडू सुमित चाच्युल काळे (रा. भिगवण) यांच्याकडे मासे पकडण्याचे काम करतो. करकंब येथे आकाशच्या घराजवळ वडील बिंदूल काळे, सावत्र आई शालीक, सावत्र भाऊ मुकुंदराजा व पत्नी सोनी हे मुलांसह राहतात.
मुकुंदराजा याची पत्नी मागील एक महिन्यापापासून जामखेड येथे कलाकेंद्रावर नाचण्याकरिता जात आहे. तिला मयत हेमा हिने शिकवून पाठविल्याचे समज करून घेतले. सावत्र दीर मुकुंदराजा व सावत्र सासू व सासरा हे सारेजण आकाश व त्याची पत्नी हेमावर चिडून होते.आकाशने पत्नीला तू लक्ष देऊ नकोस, मी पाणी घेऊन येतो, म्हणाला. त्यानंतर ५ वाजण्याच्या सुमारास आकाश हा पाणी घेऊन येत असताना बिंदूल, शालिका व मुकुंदराजा हे मारायला येत असल्याचे दिसले.
त्यावेळी आकाशचा मुलगा प्रथमेश भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी मुकुंदराजा हातात कुराड घेऊन हेमावर धावला. तुझ्यामुळेच माझी बायको कलाकेंद्रावर जायला लागली, तुला मारून टाकतो म्हणत तिच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले, तर बिंदूल व शालिका काळे यांनी हेमाला धरले.या घटनेनंतर आकाशने पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हेमाला उपचारासाठी रुग्णालयात हलविले; परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुख्य आरोपी मुकुंदराजा काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा