जामखेड प्रतिनधी/६जुलै२०२५
जामखेड पोलिसांच्या कारवाईत दहशतवादी गुन्हेगार सागर मोहोळकर यास अटक करण्यात आले आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सलमान सुलेमान शेख, (वय २९), रा. सदाफुलेवस्ती जामखेड हे जामखेड शहरातील सेव्हन फिटनेस क्लब (जिम) येथे नेहमी प्रमाणे जिम करत असताना यातील आरोपी सागर दत्तात्रय मोहळकर, रा. जामखेड. हा त्यांचेजवळ गेला व म्हणाला की, तु जिम मध्ये उशीरा का आला असे म्हणून त्याने सुलेमान शेख यांना शिवीगाळ करुन गालावर चापट मारली व जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांना कंबरेला धरुन वर उचलुन डोक्यावर व मानेवर फरशीवर जोरात आपटुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सागर दत्तात्रय मोहळकर याचे विरूद्ध यापूर्वी प्राणघातक हत्याराने नागरिकांना मारहाण करणे, खुन करणे तसेच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे इत्यादी प्रकारचे ग्रंथाल स्वरुपाचे विविध कलमान्वये गुन्हे केलेले असून तो फरार राहुन त्याचे अस्तित्व लपवत होता. त्याच्या अशा गुन्हे करण्याचे वृत्तीमुळे जामखेड तालुक्यात व परिसरात त्याची मोठी दहशत निर्माण झाली होती. त्याचे पासून जनतेस शारिरिक भय व धोका निर्माण झालेला असताना जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा आरोपी सागर मोहोळकर हा सेवन फिटनेस जिम जामखेड येथे येणार आहे
यानुसार त्यांनी जामखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण इंगळे, पोलीस नाईक वाघ, जितेंद्र सरोदे ,पोलीस कॉन्स्टेबल घोळवे ,पळसे, माने ,दळवी ,बोराटे, बेलेकर, कोठुळे, यांचे पथक तयार करत त्यांना योग्य त्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीस पथकाने आरोपी सागर मोहोळकर यास मोठ्या सीताफिने ताब्यात घेतले आहे तो नांगट व खुनशी प्रवृत्तीचा असल्याने त्याला जामखेड कारागृहात न ठेवता मा न्यायालयाचे परवानगीने पोलीस बंदोबस्तानिशी मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे रवानगी केली आहे सदरचा आरोपी सागर मोहोळकर हा जामखेड येथील राहणारा असून तो कोणत्याही प्रकारचा काही एक काम धंदा करत नाही तो अत्यंत नंगट धाडसी व खूनशी वृत्तीचा आहे तसेच त्याचे साथीदाराचे मदतीने लोकांमध्ये दहशत निर्माण करून वेगळेवेगळे प्रकारचे गुन्हे करत असतो त्याने यापूर्वी जेलमध्ये अटक असताना एका आरोपीचा खून केला आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई अहिल्यानगर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विभाग गणेश उगले यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिस स्टेशन चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा