खर्डा प्रतिनधी/6जुलै2025
पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेच्या काळात, खर्डा नगरातील भारतीय जनता पार्टीच्या खर्डा गटाने भाविकांसाठी मोफत फराळाचे वाटप केले. स्व. संत सिताराम बाबा गडावर या पवित्र यात्रेचे आयोजन असून, महाराष्ट्रातील अनेक वारकरी येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. यंदा अंदाजे 60 ते 70 हजार भाविक उपस्थित होते, ज्यासाठी भाजपने केळी आणि फराळ वाटपाचा उपक्रम राबविला.
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे म्हणाले की, परिस्थितीमुळे अनेक भाविकांना पंढरपूर दर्शनासाठी जाणे शक्य नसते; पण देव लोकांच्या मनातच असतो असे यावेळी आवाहनही केले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यकक्ष बाजीराव गोपाळघरे, नानासाहेब गोपाळघरे, भास्कर गोपळघरे, ग्रामपंचायत सदस्य सोपान गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे,राजू मोरे,बापूसाहेब ढगे ,महालिंग कोरे ,महेश दिंडोरे, , एकनाथ गोपाळघरे, श्याम सकट , प्रशांत कांबळे मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.
या उपक्रमातून भक्तांना वेळेवर आणि पोषणदायक फराळ मिळाल्यामुळे यात्रेचा आनंद वाढला. श्री संत सिताराम बाबा गड ते एसटी स्टँड पर्यंतच्या रांगा भाविकांनी भरलेल्या होत्या, ज्यांना भाजपच्या वतीने या प्रकारे सेवा करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा