जामखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये नवीन मीटर राजरोसपणे बसवण्याचे काम सुरू असून, याबाबत मुख्यमंत्र्यांचा किंवा सरकारचा कोणताही अधिकृत आदेश नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून, ठेकेदार, संबंधित कंपनीचे कर्मचारी आणि खाजगी एजंट यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जामखेड व खर्डा येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाच्या मागणीसाठी विविध नागरिक आणि साप्ताहिक पोलीस वारंटने आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन या प्रकरणाची चौकशी व्हावी याकरिता खर्ड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्जवलसिंह राजपूत यांना दि.4 जुलै 2025 रोजी लेखी साप्ताहिक पोलीस वारंटचा अर्ज देऊन संबधीत कंपनीचे ठेकेदार व कर्मचारी आणि एजंट यांच्या चौकशीची मागणी केली आहे.सदर अर्जात नुमद म्हटले आहे की जामखेड तालुक्यामध्ये तसेच खेडोपाडी राजरोसपणे नवीन मीटर बसवण्याच्या काम जोमात सुरू आहे परंतु मुख्यमंत्री यांच्याकडून या प्रकारे कुठलेही जीआर किंवा आदेश अद्याप देण्यात आला नाही ह्या नवीन मीटरच्या नावाखाली खेडोपाडी नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामध्ये आर्थिक आणि मानसिक भविष्यामध्ये फसवणूक झाले याला जबाबदार राहणार कोण त्यामुळे मेहरबान साहेब चाललेले ठेकेदाराचे काम सखोल चौकशी करून तसेच नागरिकांची फसवणूक होणार नाही याकरिता तात्काळ आपण कारवाई करावी व आतापर्यंत किती गावांमध्ये घरांमध्ये मीटर बसवले ? तसेच ह्या लोकांना कोणाचे आदेश होते?कोणाच्या आदेशाखाली हे काम सुरू आहे याची मला लवकरात लवकर माहिती मिळावी अशी मागणी साप्ताहिक पोलीस वारंटच्या लेटरहेडद्वारे जामखेड तालुक्यातील नागरिकांनी खर्डा पोलीस स्टेशनला केली आहे.
व सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्जवलसिंह राजपूत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच चौकशी करून माहिती कळविले जाईल असे आश्वसन यावेळी दिले आहे.
सदर अर्जा वरती उमेश काळदाते ,वैभव लटपटे ,धनसिंग साळुंखे ,विकास शिंदे ,आसाराम गीते ,गोकुळ गोलेकर, आशुतोष गायकवाड ,राजेंद्र चव्हाण अशा अनेक खर्डा व राजुरी येथील नागरिकांच्या सह्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा