खर्डा प्रतिनिधी/७जुलै२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा शहर मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आज रोजी खर्डा पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.मुस्लिम समाजाबद्दल जातिवाचक शब्द वापरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तसेच मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यामुळे अहिल्यानगर (अहमदनगर) शहराचे आमदार .संग्राम जगताप यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मुस्लिम विकास परिषद सामाजिक संघटना तसेच समस्त मुस्लिम समाज बांधव खर्डा शहर यांच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला.तसेच खर्डा पोलिस स्टेशनला आज सोमवार दि-7 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वा निवेदन देण्यात आले.यावेळी मुस्लिम समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येंने उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी कॉंगेस (शरद पवार) गट जामखेड तालुका,वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुका,स्वाभिमानी शेतकरी संघटना अहिल्यानगर जिल्हा यांच्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात आला.याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जामखेड तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर पाटील,ग्रा.पं.सदस्य मदन गोलेकर पाटील,ग्रा.पं.सदस्य वैभव जमकावळे,मुस्लिम विकास परिषदेचे राज्य प्रवक्ते रिजवान बागवान,रौफ शेख,गफ्फार कुरैशी,आलताफ कुरैशी,युसुफ बागवान,अजमेर पठाण,शकील मोमीन,जमील सिकलकर,फिरोज मापाडी,कलिम शेख,इलियास कुरैशी,शाहिद मोमीन,फारूख आतार,आदि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा