जामखेड प्रतिनिधी/८जुलै२०२५
जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, पोलीस नाईक शामसुंदर जाधव, पोलीस अंमलदार प्रकाश जाधव, सचिन चव्हाण, अमोल आजबे, प्रणव चव्हाण, योगेश दळवी आणि होमगार्ड रफीक तांबोळी यांच्या पोलीस पथकाने आज दि.08 जुलै 2025 रोजी खर्डा चौक, जामखेड येथे नाकाबंदी करून विना परवाना गाडी चालवणारे आणि वाहनाच्या गाडीच्या काळ्या रंगाच्या काचा असलेल्या वाहनांवर धडक कारवाई केली आहे.
ही कारवाई दरम्यान एकूण 20 प्रकरणे नोंदवण्यात आली, ज्यामध्ये नो पार्किंग, ब्लॅक फ्रेम, ट्रिपल सीट, नंबर प्लेट नसणे, मोबाईलवर बोलणे, आणि मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक यांचा समावेश होता. पोलीस पथकाने या कारवाईत 19,500 रुपये दंड आकारला. जामखेड तालुक्यातील व शहरामध्ये पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंदे व गुन्हेगारांवर कारवाई सुरू आहे.
जामखेड तालुक्यातील आणि शहरामध्ये सर्व सामान्य नागरिकांनी या धडक कारवाईचे समाधान व्यक्त केले आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी जामखेड पोलीस स्टेशनला हजर झाल्यापासून जुगार, मटका, मावा, गुटखा, शासनाने ठरवून दिलेल्या वेळेचे पालन न करणारे कलाकेंद्रे, आणि अवैध रीत्या चालणारे धंदे बंद करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याची महिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा