खर्डा/1ऑगस्ट 2025
जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती साजरी करण्यात आली. खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत,खर्डा गावच्या सरपंच सौ.संजीवनी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह गोलेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, मार्केट कमिटी संचालक वैजीनाथ पाटील, या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी समाजातील गोरगरीब मुलामुलींना कपडे वाटप करण्यात आले.तसेच झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देवून वृक्षारोपण करण्यासाठी झाडे देण्यात आली. जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.साठे नगर येथील झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रिजवान बागवान यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात साहित्यिक बाळासाहेब शिंदे यांनी साठे यांच्या जीवन चरित्रावर अनमोल असे मार्गदर्शन केले.यावेळी विजयसिंह गोलेकर,रवी सुरवसे, सुनील लोंढे,सरपंच संजीवनी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी खर्डा ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर,राजू मोरे, महालिंग कोरे,दादा जावळे,महाराज सकट,राजू सय्यद,आलिशेर कुरेशी,शकुर शेख,पत्रकार दत्तराज पवार,संतोष थोरात,किशोर दुशी,अनिल धोत्रे,धनसिंग साळुंखे, आशुतोष गायकवाड,शाहीर बाबासाहेब राजगुरू,पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य दादा जावळे
आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाचे अध्यक्ष गणेश जाधव,स्मारक समितीचे संस्थापक विलास जाधव,दादा मोरे,सामाजिक कार्यकर्ते शंकर गायकवाड,किरण गायकवाड, समाधान जाधव,किरण जाधव,रोहित डाडर,किसन दाखले,पप्पू आलाट, भैय्या जाधव,आदी कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा