आहिल्यानगर प्रतिनधी/१ऑगस्ट२०२५
इन्स्टाग्रामवरील ओळखीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे चक्क ओळख निर्माण करून तरुणीची दीड लाखांची फसवणुक करण्यात आली आहे
यायाबत अधिक माहिती अशी की , इंस्टाग्रामवरील ओळखीतून मैत्री वाढवून फिरायला नेले, विश्वास संपादन केला आणि तब्बल दीड लाखांची सोनसाखळी घेऊन तरूण पसार झाला. ही घटना शहरातील ओमरूद्रा कॉलनीत घडली. Ahmedabad शुभांगी विजय काळे (वय-२२, रा.ओमरूद्रा कॉलनी, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी पवन आंबादास सुरवसे (रा. डिसलेवाडी, ता. जामखेड जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे यांची दोन महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर सुरवसे याच्याशी ओळख झाली होती. दरम्यान गुरुवारी (ता. २४) काळे व तिच्या मित्र मैत्रिणींना त्याने आपल्या मोटारीतून (एम एच १७ ए एच ९९००) दोन दिवस लोणावळ्याला फिरायला नेले.
शनिवारी (ता.२६) सकाळी शिरूरला परतल्यावर मित्र मैत्रिणींना त्यांच्या घरी सोडल्यानंतर काळे यांना ओमरुद्रा काँलनेत सोडण्यासाठी आला असता त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी पाहून 'तुझ्या प्रमाणे गणपतीचे पदक असलेली सोनसाखळी मलाही बनवायची आहे' असे म्हणत पाहायला म्हणून घेतली. तिच्या परवानगीने गळ्यातही घातली आणि तसाच पसार झाला.
त्यानंतर काळे यांनी त्याच्याशी वारंवार संपर्क साधला. परंतु त्याने प्रतिसाद न दिल्याने विश्वासघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप पुढील तपास करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा