जामखेड प्रतिनधी/३१जुलै२०२५
जामखेड तालुक्यातील आनंदवाडी गावात १० वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने बांधलेला सभामंडप अचानक कोसळल्याने ग्रामपंचायतीवर कामाच्या निकृष्टतेचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे.
मोजे आनंदवाडी येथील ग्रामपंचायतीच्या १० वर्षांपूर्वी बांधलेल्या सभामंडपाचा ३० जुलै २०२५ रोजी दुपारी सुमारे तीन वाजता भुईसपाट होण्याची घटना घडली. या सभामंडपात गावातील नागरीक आणि लहान मुलं खेळत असत, मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर सभामंडपाच्या बांधकामावर गांभीर्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या कामाच्या निकृष्टतेमुळे आणि भ्रष्टाचारामुळे हे बांधकाम अत्यंत कमजोर झाले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी केला आहे.
याशिवाय, ग्रामपंचायतीने केलेल्या अन्य विकासकामांतही गंभीर तोटा आहे. अंगणवाडी शाळा देखील निकृष्ट दर्जाची असून तीही पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता व लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतीने स्मशानभूमी करण्याच्या प्रकल्पाचा मागील रस्त्यासाठी कोणतीही सोय न केल्याने मृत्यूच्या वेळी अंत्यसंस्कारासाठी अडचणींचा सामना करावा लागतो.
पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आलेल्या निधीचा काहीही उपयोग होत नसल्याचेही या निवेदनात नमूद आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या कामांची पूर्ण चौकशी करावी आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाड़े यांच्याकडून करण्यात आली आहे.
अशा प्रकारची चौकशी वेळेवर न झाल्यास, ग्रामस्थ तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची दखल घेण्याची विनंती आनंदवाडी ग्रामपंचायतीच्या कामाबाबत करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा