आहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यांवर मोठा धडक बसवत संगमनेर शहर, मिरजगाव व लोणी पोलिस ठाणे हद्दीत दोन दिवसांत तब्बल नऊ ठिकाणी छापे टाकून 12 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत दारू वाहतूक, जुगार आणि मावा विक्री अशा गंभीर अवैध धंद्यांचा पर्दाफाश करत 4 लाख 25 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा संपूर्ण सफाया करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी आपल्या अधिपत्याखाली विशेष पोलिस पथके तयार केली. पोलीस अंमलदार अनंत सालगुडे, गणेश लोंढे, संतोष खैरे, राहुल द्वारके, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, बाळासाहेब नागरगोजे, भिमराज खर्से, बाळासाहेब गुंजाळ, चंद्रकांत कुसळकर आणि महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
दिनांक 29 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर 2025 रोजी पथकांनी अवैध धंद्यांच्या ठिकाणी छापे टाकले.संगमनेर शहरदारू वाहतूक व विक्री करणाऱ्या तिघांविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण 3,81,460 रुपयांचा दारुचा साठा, अल्टो कार व मोटारसायकल जप्त.जुगार खेळणाऱ्या दोन आरोपींना पकडून 5,200 रुपयांची रोकड जप्त.मिरजगाव दोन ठिकाणी छापेमारी करत 7,000 रुपयांचा मावा जप्त, दोन्ही आरोपींवर कारवाई.लोणीमावा विक्रीप्रकरणी 2 आरोपींना पकडले असून एकूण 32,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.एकूण निष्कर्षगुन्हे दाखल: 9आरोपी संख्या: 12जप्त मुद्देमाल: 4,25,660 रुपये पोलिसांचे प्रयत्नही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेने शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करून यशस्वीपणे पार पाडली.अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी अशी कारवाई आगामी काळात सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा