खर्डा प्रातिनीधी/३ऑक्टोबर२०२५
जामखेड तालुक्यातील मौजे खर्डा येथे आठवडे बाजारपेठ विकासासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या नागरी सुविधा योजने अंतर्गत २० लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.या मंजूर निधीमुळे खर्डा गावातील पारंपरिक आठवडे बाजारपेठेचा विकास होणार असून व्यापारी, शेतकरी तसेच नागरिकांना सोयीस्कर व सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहेत. गावाचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी हा निधी मोठा हातभार ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांचे समस्त खर्डा ग्रामस्थांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा