खर्डा प्रतिनधी/३ऑक्टोबर२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील भीमनगर येथील धम्म सागर बुद्ध विहारात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी बुद्ध वंदना, बुद्धपूजा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पूजनाचा मान प्रशांत कांबळे, प्रवीण जावळे आणि दीपक जावळे यांना मिळाला, तर बुद्ध वंदना व पूजनाचा कार्यक्रम भीमराव घोडेराव यांनी पार पाडला
.या प्रसंगी तरुण, बालक, महिला-पुरुष उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐतिहासिक प्रवेशद्वाराचे उद्घाटन धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून
भीमसैनिकांनी स्वखर्चातून "स्वाभिमानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार" उभारले असून त्याचे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले.खर्डा शहराच्या इतिहासात प्रथमच उभारण्यात आलेल्या या भव्य दिव्य प्रवेशद्वारामुळे शिर्डी–तुळजापूर मार्गावरील प्रवाशांचे लक्ष वेधले जात आहे.प्रवेशद्वार उभारण्यासाठी अनेकांनी श्रमदान, वेळ आणि विविध प्रकारचे सहाय्य केले . कार्यक्रमात आणि प्रवेशद्वाराच्या निर्मितीत ज्यांनी मन:पूर्वक योगदान दिले त्या सर्वांचे आयोजक व भीमसैनिकांनी विशेष आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा