जामखेड प्रतिनिधी / ५ ऑक्टोबर २०२५
आष्टी तालुक्यातील एका गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चारचाकी वाहनातून उचलून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना प्रकाशात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार . आष्टी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.दि.२५ सप्टेंबर रोजी आरोपी पवन पोठरे (वय २४, रा. डोणगाव, ता. जामखेड, जि. आहिल्यानगर) याने आपल्या चार साथीदारांसह अल्पवयीन मुलीला तिच्या गावातून जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवले. त्यानंतर त्यांनी तिला प्रथम खडकत येथे आणि नंतर पनवेल येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला.दि.२७ सप्टेंबर रोजी त्यांनी मुलीला पुन्हा गावात आणून सोडले. घडलेली संपूर्ण घटना पीडित मुलीने आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारदारांच्या तक्रारीनुसार दि.२९ सप्टेंबर रोजी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी आरोपी पवन पोठरेला ताब्यात घेतले असून त्याच्यासह इतर चार आरोपींवर कठोर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एन. बी. सूर्यवंशी आणि पोलिस अंमलदार सचिन पवळ करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा