खर्डा प्रतिनधी/२६ मार्च२०२५
जामखेड तालुक्यातील खैरी मध्यम प्रकल्पातील वीज जोडणी तोडल्यामुळे उसाच्या पिकांची पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आज दि 26 मार्च रोजी शिर्डी – हैदराबाद राज्य मार्गावर, खर्डा बस स्थानक समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक तास रास्ता रोको आंदोलन केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "खैरी प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा असेपर्यंत शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे. या परिसरातील हजारो टन ऊस सध्या पाण्याची वाट पाहत आहे. वीज बंद ठेवली तर उभ्या पिकाला पाणी देता येणार नाही, याचा आर्थिक फायदा खर्डा बाजारपेठेवर होईल." त्यांनी पद्धतशीररीत्या प्रशासनाने कायदा हातात घ्यायला लावू नये असा इशारा देखील यावेळी दिला.
खैरी मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता गणेश काळे यांनी सांगितले की, प्रकल्पात आज रोजी 160.51 द.ल.घ.फु. उपयुक्त पाणीसाठा आणि मृत पाण्याचे 48.38 द.ल.घ.फु. आहे, एकूण 208.89 द.ल.घ.फु.पाणीसाठा आहे. सध्या पाण्याची 33.08 टक्केवारी आहे.
जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारसमोर मांडण्याचे आश्वासन दिले असून त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विजयसिंह गोलेकर,दत्तात्रय भोसले, चंद्रकांत गोलेकर, शिवाजी भोसले, दत्तात्र्य भोसले,कल्याण सुरवसे, श्रीकांत लोखंडे, आजिनाथ लटके, भोसले शंकर गुळवे,गणेश लटके,राजेंद्र भोसले,दादा शिकारे, नाना शेळके, आबा केसकर, पांडुरंग भोसले, काका शेळके, अण्णा सावंत, इतर अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा