खर्डा प्रतिनधी/१२जुलै२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा किल्ल्यासमोर दि. 12 जुलै 2025 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता एका वाहनातून बळजबरीने कत्तलीसाठी जनावरे वाहतूक करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खर्डा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम (1995) आणि प्राण्यांना छळ प्रतिबंध अधिनियम (1960) यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे खर्डा अंतर्गत चाललेल्या तपासात समोर आले आहे की, आयशर कंपनिच्या टेम्पो (कंटेनर) वाहन क्रमांक MH-11-CH-3086 मध्ये आरोपींनी बळजबरीने दाटीवाटीने HF क्रॉस जातीचे 62 नर आणि 9 मोठ्या गाई तसेच गीर जातीच्या 4 नर आणि म्हशीचे 5 रंडे असे एकूण अनेक जनावरे कत्तलीसाठी नेण्याचा प्रयत्न केला. यापैकी 10 जनावरांपैकी 2 चे गळ्याला कापलेले असून, या प्रकरणी प्राण्यांचे छळ झाला आहे.
सदर प्रकरणातील आरोपी नामे. आफताफ रसूल पठाण (वय 25, चालक) आणि साजीद सिकंदर शेख (वय 42) रा.खडकत ता.आष्टी यांचा समावेश आहे. हे दोघेही या वाहनात होते आणि आरोपी असून, तपासानुसार, या प्रकारामुळे प्राण्यांच्या संरक्षणाचा गंभीर भंग झाला असून, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 च्या कलम 5(अ), 5(ब), तसेच प्राण्यांना छळ प्रतिबंध अधिनियम 1960 च्या कलम 3 व 11 आणि भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 325, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्जवलसिंह राजपूत यांचे सुचना व मार्गदर्शना खाली पो.हवा./ संभाजी शेंडे पो.काॅ/ शशी म्हस्के, बाळू खाडे, अशोक बडे, गणेश बडे, धनराज बिराजदार यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा