अहिल्यानगर प्रतिनधी/१२जुलै२०२५
राहुरीतील नगर-मनमाड मार्गावर ग्रीन हॉटेलच्या समोर, दि. ११ जुलै रोजी पहाटे सुमारे १.१५ वाजता एका एसटी बस चालकावर पांढऱ्या रंगाच्या कारने धक्का दिल्यानंतर तीन व्यक्तींनी शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेच्या संदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार तात्याराम शिवाजी दहिफळे (वय ३६), जो नाशिक आगारामध्ये एसटी बस चालक म्हणून कार्यरत आहे, त्यांनी दिलेल्या फिर्यादीत सांगितले की, तो जामखेडहून लातूर ते नाशिक येणारी बस चालवत नाशिककडे जात असताना कारने बसच्या ड्रायव्हर साईडवर धक्का दिला. त्यानंतर कारमधून उतरलेले दोन अनोळखी लोक त्याच्यावर हल्ला करीत मारहाण करीत शिवीगाळ करत होते. या वेळेस ग्रीन हॉटेलच्या परिसरातून आणखी एक व्यक्ती धावून येऊन त्याला मारहाण करत धमकी दिली.
तात्यारामने बस थेट राहुरी पोलीस ठाण्यात आणून संबंधित तिघांविरुद्ध मारहाण, धमकी, आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी आरोपींमध्ये पिंटूनाना साळवे आणि दोन अनोळखी लोकांचा समावेश असल्याची माहिती दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा