जामखेड प्रतिनधी/१३जुलै२०२५
जामखेड शहरातील संविधान चौकाजवळ दि. ११ जुलै रोजी रात्री फळ विक्री करणार्या समीर बागवान यांना दोन व्यक्तींनी बंदूकीची धमकी देत दररोज ५०० रुपये देण्याची मागणी करून धमकावल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदवला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जामखेड मधील संविधान चौकाजवळ लक्ष्मीआई मंदिराच्या समोर फळ विक्री करत असलेल्या समीर बागवान यांच्या फळांच्या गाड्यात आरोपी सोनू वाघमारे रा.आरोळीवस्ती ता.जामखेड व आदम जलाल शेख रा. फकराबाद ता.जामखेड यांनी येऊन मारहाण केली. त्यांनी एका बंदूकीचा धाक देत, "फळ विकायचे असल्यास रोज ५०० रुपये द्यावे लागतील," अशी धमकी दिली. समीर यांच्यावर मारहाण करत त्यांनी फळांचेही नुकसान केले. जर आम्हाला न विचारता फळाचे दुकान लावले तर आमचेकडील बंदुकीने गोळीबार करण्याची धमकी दिली आहे.
या प्रकरणी समीर बागवान यांच्या तक्रारीवरून भा.द.सं.च्या विविध कलमान्वये (३०८(२), ३२४(४), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५)) गुन्हा क्र. ४०४/२०२३ जामखेड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी आणि पोसई गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास पोसई गावडे करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा