नेवासा (प्रतिनिधी)-५ जानेवारी
राज्याचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे सभापती प्रा.ना.राम शिंदे,राज्याचे जलसंपदा मंञी ना.राधाकृष्ण विखे - पाटील तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व आमदार महोदयांचा सत्कार समारंभ व नेवासा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे - पाटील यांच्यावतीने तालुक्यातील मतदारांचे जाहिर आभार व नवनिर्वाचित आमदार व नामदार यांचा जाहिर सत्कार समारंभ रविवार (दि.५) रोजी दुपारी १२ वाजता आराध्या मंगल कार्यालयात आयोजित केला असल्याची माहीती या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचगंगा उद्योग समुहाचे अध्यक्ष प्रभाकर (काका) शिंदे यांनी यावेळी बोलतांना दिली.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे जलसंपदा मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे नवनिर्वाचित विधान परिषद सभापती प्रा.ना.राम शिंदे उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील महायुतीचे आमदार
शिवाजीराव कर्डिले,संग्राम जगताप,डॉ.किरण लहामटे, श्रीमती मोनिकाताई राजीव राजळे, आशुतोष काळे, विठ्ठलराव लंघे - पाटील,अमोल खताळ,काशिनाथ दाते,विक्रमसिंह पाचपुते तसेच भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नितिन दिनकर आदी मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित केला असल्याची माहीती पंचगंगा उद्योग समुहाचे अध्यक्ष प्रभाकर (काका) शिंदे यांनी दिली असून या कार्यक्रमास नेवासा तालुक्यातील शिवसेना, भाजपा,राष्ट्रवादी,रिपाई,शेतकरी संघटना व महायुतीच्या सर्व घटक पक्षासह नागरीकांनी मोठ्या संख्यने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment