पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/७ जानेवारी २०२५
मराठी पत्रकार सृष्टीचे जनक अद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन ६ जानेवारी महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन म्हणून घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त खर्डा येथील कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी खर्डा पोलीस स्टेशनला पत्रकार दिन साजरा करत सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शुभेच्छा देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहेत यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. त्यानिमित्ताने खर्डा येथे नवीन पोलीस स्टेशनला रुजु झाल्यानंतर आज स्टेशनमध्ये पहिलाच पत्रकार दिन साजरा करण्यात आला आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकारिताही पत्रकारांच्या लेखणीतून दिसली पाहिजे. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. पत्रकारांनी समाजातील घडेल ती बातमी लिहिली पाहिजे. शोध पत्रकारिता केली पाहिजे. अशाच प्रकारे आपल्या खर्डा येथील सर्वच पत्रकार आपल्या आपल्या परीने चांगलेच काम करत आहेत.मी सर्वच पत्रकारांना आज पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो यावेळी पत्रकार संतोष थोरात, श्वेता गायकवाड,दत्तराज पवार, बाळासाहेब शिंदे, किशोर दुषी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, पत्रकार संतोष थोरात, श्वेता गायकवाड,दत्तराज पवार, बाळासाहेब शिंदे, किशोर दुषी,धसनसिंग साळुंखे, अनिल धोत्रे, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत म्हस्के उपस्थित होते.
No comments:
Post a Comment