पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/४ जानेवारी२०२५
काल दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी खर्डा येथे ग्रामीण विकास केंद्र संचालित भटके, विमुक्त संसाधन केंद्र खर्डा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खर्डा ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. संजीवनी ताई पाटील आणि प्रमुख पाहुणे म्हणून खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. प्रियंका मेंडके मॅडम तसेच ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापूसाहेब ओव्होळ तसेच डॉ. बिपिन चंद्र लाड , पत्रकार संतोष थोरात, यावेळी उपस्थित होते . सरपंच संजीवनी ताई पाटील म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांचे विचार घराघरात गेले पाहिजेत. आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की सावित्रीबाई फुले यांचे विचार आपल्या मनामध्ये रुचले पाहिजेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका मेडके मॅडम म्हणाल्या की, पहिल्या काळामध्ये सावित्रीबाई एकट्या होत्या तरीही महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सावित्रीबाईंनी केलं. यावेळी त्या बोलत होत्या. तसेच बापूसाहेब ओव्होळ म्हणाले की, सावित्रीबाई फुले कोणत्याही एका जातीसाठी एका समाजासाठी काम करत नव्हत्या तर त्यांच्या मध्ये अनेक समाजाचा समावेश होता. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष विशाल पवार यांनी केली.यावेळी ते म्हणाले की, महामानवांच्यां विचारांच्या माध्यमातून संविधान तयार झाले म्हणून आज महिलांना न्याय आणि अधिकार मिळत आहे. तसेच पत्रकार संतोष पवार म्हणाले की, प्रत्येक स्त्रीने किमान दोन मुलांना तरी घडवायला हवे ते घरचे असो किंवा बाहेरचे असोत. तसेच परविन शेख म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांचा फोटो कमीत कमी आपल्या घरात तरी बसवावा. यावेळी प्रस्तावना मंगल शिंगाणे यांनी केली. कार्यक्रमाचे. अनुमोदन उर्मिला कवडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार नीता इंगळे यांनी मांडले . या कार्यक्रमासाठी उपस्थिती जामखेड तालुका अध्यक्ष आतिष पारवे , पांडुरंग शिंगांणे ,आशा टेपाळे, आयोध्या गोरे, रुकसाना मापाडी, लैला मदारी, सविता खरात, रेखा खटावकर, रेखा पुलावळे, राधिका गायकवाड, मनीषा काळे, आशा जाधव, शालन आरुणे, सगुना मोरे, आशाबाई काळे, आशमा आतार, इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment