अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. या नवीन बदलांमध्ये परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांची नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून प्रशिक्षणार्थी नेमणूक करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे नेवासा पोलीस ठाण्याच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल झाला आहे.
संतोष खाडे यांच्यासमोर आता नेवाशातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नेवासा पोलीस ठाणे कसे कार्य करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या नवीन नियुक्तीसोबतच सध्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना नियंत्रण कक्ष (अहिल्यानगर) येथे पाठवण्यात आले आहे. ही बदली नेवासा पोलीस ठाण्यातील कार्यपद्धतीत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.दि.२५ मार्च रोजी नेवासा पोलीस ठाण्यात संतोष खाडे यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.
या स्वागत समारंभात पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, तसेच अनेक उपनिरीक्षक आणि कर्मचारीवर्ग उपस्थित होते. या समारंभाने नवीन प्रभारी अधिकाऱ्याच्या आगमनाचे औपचारिक स्वागत केले आहे
नेवासा पोलीस ठाण्यातील हे नवीन बदल स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यास मदत करतील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा