पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२०नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे खर्डा किल्ल्यासमोरीजनस सुविधा केंद्राचे बांधकाम सद्य सुरू आहे व तेच जनसेवा केंद्राचे बांधकाम ऐतिहासिक किल्ल्यासमोर असल्याने किल्ल्याचा 80% भाग या बांधकामाच्या इमारतीने झाकला जात असून यामुळे जिल्हा व तालुक्याच्या व परिसराच्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या खर्डा किल्ल्याच्या ऐतिहासिक सौंदर्य या जन सुविधा केंद्राच्या रूपाने पडदा पडेल व त्यामुळे किल्ला शिवभक्त इतिहास दिसणार नाही याबाबतचे रीतसर निवेदन श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने तहसीलदार योगेश चन्द्रे यांना देण्यात आले असून ,
या निवेनात म्हटले आहे जामखेड तालुक्यातील महत्वाचे ऐतिहासिक स्थळ व मराठ्यांच्या शेवटच्या विजयी लढाईचा साक्षीदार ऐतिहासिक किल्ले शिवपट्टण ऊर्फ खंडो किल्ल्याच्या समोर जनसुविधा केंद्र या नावाने उपहारगृह व स्वच्छतागृह गैरसरकारी संस्था (NGO) उपक्रमांतर्गत सुलभ इंटरनॅशनल संस्थेने जे बाधकाम किल्ल्याच्या अगदीच समोरील बाजूस किल्ल्याचा खंदकावर सुरु करण्यात आल्याने खंदकाचे नुकसान झाले असुन मुळ ऐतिहासिक वास्तुला गालबोट लागले आहे.
हे बांधकाम खर्डा किल्ल्याच्या अगदीच समोर सुरु झाल्याने किल्ल्याची ऐतिहासिक तटबंदीचा एकुण ८० टक्के भाग या बांधकामाच्या इमारतीने झाकला जाईल व यामुळे या जिल्हा व तालुक्याच्या व परिसराच्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या खर्डा किल्ल्याच्या ऐतिहासिक सौंदर्य या जनसुविधा केंद्राच्या रुपाने पडदा पडेल व यामुळे किल्ला शिवभक्त इतिहास प्रेमी पर्यटक यांना तो दृष्टीक्षेपात पडणार नाही
ते होऊ नये यासाठी परिसरातील शिवभक्त धारकरी शिवप्रेमी इतिहास प्रेमी गडदुर्गप्रेमी पर्यटक व खर्डा ग्रामस्थ यांच्या वतीने सदरील जनसुविधा केंद्राचे बाधकाम हे खर्डा किल्ल्याच्या समोरील जागेत न करता त्यासाठी त्यास बाजुची कुठल्याही ऐतिहासिक वास्तूपासुन दूर जागा उपलब्ध करून देण्यात यावी . व तोपर्यंत हे बांधकाम रोखण्यात यावे असे निवेदनात म्हंटले आहे असून तरी सदरील निवेदनाच्या अनुषंगाने पुढच्या दोन दिवसांत कारवाई झाली नाही तर आमरण उपोषणाचा आम्ही सर्व शिवभक्त धारकरी गडदुर्ग इतिहास प्रेमी व खर्डा ग्रामस्थ देत आहोत असा इशारा यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व खर्डा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले असून संकेत सातपुते ,बबलू निकम, महारुद्र हुंबे ,धीरज कसबे यांच्या निवेदनावर सह्या असून यावेळी उपस्थित होते
No comments:
Post a Comment