पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२० नोव्हेंबर
धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी यशवंत सेनेच्यावतीने चौंडी येथे सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी माजी मंत्री आ.राम शिंदे यांनी भेट देऊन विचारपूस केली. धनगर आरक्षणप्रश्नी शासनपातळीवर हालचाली सुरु असून, लवकरच ठोस निर्णय होण्याचे सूतोवाच आमदार शिंदे यांनी यावेळी केले.
यासंदर्भात यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे म्हणाले, की धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, ही मागणी घेऊन यशवंत सेनेने दोन महिन्यांपूर्वी तब्बल २१ दिवसांचे आमरण उपोषण केले. ते उपोषण थांबविताना राज्य सरकारने ५० दिवसात अंमलबजावणीसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र या कालावधीत शासनाकडून काहीच कृती झाली नाही. त्यामुळे पुन्हा उपोषण करण्याची वेळ आली
No comments:
Post a Comment